राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी : स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात IQAC विभागा द्वारे स्कूल कनेक्ट 2.0 कार्यक्रम प्राचार्य डॉ. एम के मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षणाच्या संधी बाबत मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
राजे धर्मराव विज्ञान कनिष्ठ व धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात प्रा.तानाजी मोरे यांच्या स्वागत पर भाषणानंतर प्रा. अतुल खोब्रागडे आणि प्रा.अनिकेत गोंडे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व कॅरिअर मार्गदर्शनाबाबत व्याख्याने दिली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक प्रा. उदय सरमोकदम यांचे प्रेरणादायी भाषण होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून शैक्षणिक प्रगती साधण्याचे महत्त्व समजावले.
समारोप प्रा. कुणाल बनकर यांनी आभार प्रदर्शन करून केला कार्यक्रमासाठी निरीक्षक म्हणून प्रा. शामल विश्वास प्रा. रमेश हलामी डॉ.सुनंदा पाल डॉ. अरविंद राठोड प्रा. सुनील खंडाळे प्रा. विजय उरकूडे होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून प्रेरणा घेतली असून महाविद्यालयाने भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
Comments are closed.