Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 1 एप्रिल – चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रे) येथे शिक्षण घेणारे विद्यार्थीनीं दरवर्षी केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे पुढील शिक्षणासाठी निवड होत असतो.अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील रहिवासी असलेली कन्या ही चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा (रे) येथील जि.प.उच्च.प्रा.कन्या शाळा येथे इयत्ता ५ वी त शिकणारी विद्यार्थ्यांनी क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार हिने नवोदय विद्यालयाचे परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याने हीचा गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणा करिता निवड झालेली आहे.

यावेळी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, केंद्रप्रमुख गोमासे आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक गोटामी, वर्गशिक्षक निमाई मंडल, रोशन बागडे, गौतम गेडाम, वर्षा गौरकर, रेखा हटनागर, प्रीती नवघडे, विलास मेश्राम, आई वडील आणि आजी आजोबा यांना दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.