Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्व. प्रा. मदन धनकर यांना एसबी महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 30 जुलै : सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व एस. बी. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदन धनकर सरांचे प्रदीर्घ आजारानंतर दुःखद निधन झाले त्यांना आज महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश लाभसेटवार यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल विस्तृत माहिती मध्ये त्यांचे ग्रंथावर व ग्रंथालयावर विशेष प्रेम असल्याबद्दल सांगितले त्यांचे वक्तृत्व रसिक प्रिय होते त्यांचे चार भाषेवर प्रभुत्व होते त्यांचा कार्यकाळ म्हणजे आदर्श प्राचार्याचा प्रामाणिक कार्यकाळ ठरला असे त्यांनी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली मध्ये सांगितले त्यानंतर प्रा. उत्तरवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना धनगर साहेबांचा काळ गौरवपूर्ण कसा राहिला त्याचे वर्णन केले संचालन प्रा. गजानन जंगमवार यांनी केले याप्रसंगी प्रा . मंगला बनसोडे प्रा.घोडेस्वार प्रा.घोंनमोडे मॅडम प्रा.पेंदाम प्रा.लांडे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.