Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाकिस्तान हादरलं! जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; 35 जणांचा मृत्यू

दोनशेहून अधिक जखमी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पाकिस्तान बॉम्बस्फोट :-  पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये आज एका राजकीय पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 35 जणांचा मृत्यू तर दोनशेपेक्षा अधिक लोक जखमी झाले. ही घटना पख्तूनख्वा राज्याच्या बाजौर तालक्यात रविवारी दुपारी घडली. पाकिस्तानमधील सत्तेत सहभागी असलेल्या जमीयत उलेमा इस्लाम फजल (JUI-F) या राजकीय पक्षाची रॅली सुरू होती हे विशेष.

जमीयत उलेमा इस्लाम फजल (JUI-F) या पक्षाचे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्लाह या रॅलीला संबोधित करणार होते. मात्र, ते काही कारणाने सभास्थळी पोहचू शकले नाही. मात्र, घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हाफिज म्हणाले की, या बॉम्ब स्फोटात आमच्या पक्षाचे तब्बल 35 कार्यकर्ते दगावले असून, आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत असून, अशा हल्ल्यातून आम्हाला कमजोर कुणीही करु शकत नसल्याचे हाफिज यावेळी म्हणाले. तर पुढे ते म्हणाले की, याआधीही असे हल्ले झालेले आहेत. मात्र, अशा हल्ल्यांची आता तळापर्यंत जाऊन चौकशी होणे गरजेचे आहे. आता या हल्ल्याबाबत आम्ही संसदेत आवाज उठवणार आहोत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पंतप्रधानानी दिले चौकशीचे आदेश

जमीयत उलेमा इस्लाम फजल (JUI-F)चे अध्यक्ष मौलाना फजल यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना या घटनेनंतर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पंतप्रधानांनी या घटनेची माहिती जाणून घेत चौकशीचे आदेश दिले असून, जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.