Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवणकाम प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण; २० महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण

धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर व पहेल मल्टीपर्पज सोसायटीचा स्तुत्य उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर: सोनेगाव येथे महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याच्या मोफत शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमहाप्रबंधक देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण वाचनालय, सोनेगाव येथे पार पडले.

या प्रशिक्षणात महिलांना शिवणकामाच्या मूलभूत गोष्टींपासून ते आधुनिक कौशल्यांपर्यंत सर्वंकष मार्गदर्शन देण्यात आले. मशीन वापरण्यापासून, कटिंगचे तंत्र, फिनिशिंग व कपड्यांचे कलात्मक शिवणकाम आदी गोष्टी शिकवण्यात आल्या. या उपक्रमाचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांच्यात स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे हा होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी नुकतेच एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संजीत रावत (मुख्यव्यवस्थापक, धारीवाल) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिष नायर, धिरज ताटेवार, सरपंच संजय उकीणकर व प्रशिक्षिका सौं. रसिका खांडाळकर यांची उपस्थिती लाभली.

एकूण २० महिलांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षणही व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सपना येरगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष हलगे यांनी मानले. अंजुषा काकडे व दिनेश कामतवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये नवचैतन्य संचारले असून, रोजगाराच्या नव्या संधी उभ्या करण्याची दिशा या प्रशिक्षणातून मिळाली आहे. अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवले जातील, असे आयोजकांनी सांगितले.

 

Comments are closed.