Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! ट्रॅक्टरखाली चिरडून १५ वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क      

सोलापुर –  सोलापुरातील दत्त चौक परिसरात एक १५ वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या खाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे.

समर्थ धोंडिबा भास्कर हा मुलगा सायकलीवरून रस्त्याने जात असतांना त्याचा तोल गेला आणि भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोक चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दत्त मंदिर-लक्ष्मी मार्केट रोडवरती हा अपघात झाला आहे.

मागच्या कित्येक दिवसांपासून ‘स्मार्ट सिटी’ च्या अनंतर्गत या ठिकाणी रस्त्याची काम सुरु आहेत, त्यामुळे नागरिकांना वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. आणि याच वेळकाढूपणाची किंमत एका १५ वर्षीय बालकाला त्याचा जीव देऊन मोजावी लागली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला व मृत बालक समर्थ धोंडिबा भास्कर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवण्यात आला आहे.

दरम्यान एम.एच.१३ सी.एस. ६५४१ या क्रमांकाची ट्रॅक्टर आणि त्याचा चालक चिदानंद मलगोंडा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा: 

एकामागोमाग एक महिला पडल्या ‘त्या’ मॅनहोल मध्ये, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने बचावले थोडक्यात

गावांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी महाविकासआघाडीची नवी योजना; 10823 कोटींचा प्रकल्प

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.