Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येत असतांना भावाचा अपघाती मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. ८ एप्रिल: तालुक्यापासुन २ किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील अत्यंत गरीब कुटुंबात बहिणीचे लग्न १४ एप्रिल ला असतांना बहिणीच्या लग्नाचे पत्रिका वाटप करुन परत येत असतांना बेळगांव-झनकारगोंदी फाट्यावर मोटारसायकलचा तोल जाऊन पवन केजाराम देवांगना (२५) याचा जागीच मृत्यु झाला तर त्याच्या सोबत असलेले प्रमोद करंगसू देवांगना (२४) व जागेश्वर पंचराम देवांगन (१९) रा. कोचीनारा हे गंभीर जखमी झाले आहेत.

गंभीर जखमीस ग्रामीण रुग्णालय कोरची येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचार करण्यासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अठरा विश्वेश्वर दारिद्र्य असलेला एकुलता एक सुशिक्षित मुलगा पवन देवांगन हा मिळेल ते काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. जाती व्यवसायाला बगल देऊन ईटियाडोह, नवेगाव बांध, व मिळेल त्या ठिकाणाहून मच्छी विकत घेवून तालुक्यातील गावातील बाजारात विकायला जात असे. केजाराम देवांगन यांच्या तीन मुलीनंतर जन्माला आलेला पवन हा मुलगा, सुशिक्षित बेरोजगार असून मेहनती होता. आपल्या चुलत भावांना घेऊन बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येत असतांना काळाने झडप घातली. डोक्यावर हेल्मेट असता तर कदाचित पवन वाचू शकला असता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.