Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तब्बल ६ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या तावडीतून CRPF जवानाची सुटका

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह मनहास यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, ८ एप्रिल : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये  गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह मनहास यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. ७ एप्रिल रोजी राकेश्वर सिंह मनहास यांचा एक फोटो समोर आला होता. हा फोटो नक्षलवाद्यांनी जारी केला होता. त्याशिवाय सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह अद्याप जिवंत असल्याचा दावा केला होता. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह मनहासला सोडलं आहे. राकेश्वर सिंहला रुग्णवाहिकेतून विजापूर येथे आणण्यात आले आहे. राकेश्वर यांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोब्रा जवान राकेश्वर मनहार ६ दिवसांनंतंर नक्षलवाद्याच्या तावडीतून सुटले आहे. सरकारने गठण केलेल्या दोन सदस्यीय मध्यस्ती टीमचे सदस्य पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैयासह शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली. सुटकेनंतर मध्यस्ती केलेली टीम जवानाला घेऊन बासागुडा येथे परतत आहे. जवानाच्या सुटकेसाठी मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या दोन सदस्यीय टीमसह बस्तरच्या ७ पत्रकारांची टीमदेखील उपस्थित आहे. नक्षलवाद्यांनी बोलावल्यानंतर जवानाची सुटका करण्यासाठी बस्तर येथील बीहडमध्ये वार्ता दलासह एकूण ११ सदस्यांची टीम पोहोचली होती. अद्याप या प्रकरणात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सुटका करण्यासाठी नक्षलवाद्यांच्या कोणत्या अटी होत्या, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या अटींबाबत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापुर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत २२ जवान शहीद झाले. पण माओवाद्यांनी या चकमकीत २४ जवान ठार झाल्याचा दावा केला. तसंच अपहरण केलेले जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावाही माओवाद्यांनी केला होता.

७ वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

तब्बल तीन महिन्यांपूर्वी जवान राकेश्वर सिंह मनहास यांची छत्तीसगडमध्ये त्यांची पोस्टिंग झाली होती. ७ वर्षांपूर्वी राकेश्वर सिंह यांचं लग्न झालं होतं. सध्या त्यांना ५ वर्षांची मुलगी आहे. आई कुंती देवी आणि पत्नी मीनूने केंद्र आणि राज्य सरकारकडूम राकेश्वरला नक्षलवाद्याच्या तावडीतून सोडण्याची मागणी केली आहे.

Comments are closed.