Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! चंद्रपुरातील दुर्गापुरच्या शेतशिवारात अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

घातपात की हिस्त्र पशुचा हल्ला. पोलीस तपासात होणार उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. १७ जानेवारी – चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेकोली ११ केव्ही सबस्टेशन जवळ एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वेकोली दुर्गापूर ११ केव्ही विद्युत सबस्टेशन जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले असून प्रथमदर्शी हिस्त्र पशुचा हल्ल्यात  सादर इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी ही घटना घातपाताची असल्याचे नाकारता येत नाही. या घटनेविषयी दुर्गापूर पोलीस विभाग अधिक चौकशी करीत आहेत. संपूर्ण तपासअंती अज्ञात इसमाच्या घटनेविषयी माहिती स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.