Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! पोहण्यासाठी गेलेल्या तिन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड, दि. १६ एप्रिल: बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात शुक्रवारी सांयकाळच्या साडे पाच- सहाच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या तीघांचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.  

बीड तालुक्यातील पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीत बीड शहरातील गांधी नगर भागातील तिघे मित्र पोहण्यासाठी म्हणून गेले होते, परंतु खदाणीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना प्राप्त होताच घटनास्थळी पोहचले असून दोघांचे मृतदेह चौकशी दरम्यान सापडले असून मोका पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून सदर एकाचा शोध घेणे सुरु आहे. या घटनेची माहिती गावात होताच बघणाऱ्यांची एकच गर्दी उसळली असून गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.     

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.