Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक ! तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

पेण तालुक्यातील रात्रीची धक्कादायक घटना

आरोपीला तास भरात घेतले ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रायगड डेस्क 30 डिसेंबर:- गणपतीचे पेण अशी जगभरात ख्याती असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील असलेल्या पेण ला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आज दिनांक ३० डिसेंबर रोजी पाहत ३ च्या सुमारास तीन वर्ष वयाच्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पेणकरांची आजची पहाट ही या वाईट घटनेने उजाडली. पेण शहरातील मोतीराम तलाव परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोतीराम तलाव परिसरात आदिवासी कुटुंब आपल्या झोपडी वजा खोपटीत झोपले असता आरोपी याने तीन वर्ष्याच्या मुलीला उचलून नेवून तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली. सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून घटनेची खबर मिळाल्यानंतर एक तासात आरोपीला ताब्यात घेतले आहे. आधीही बलात्कार प्रकरणी त्याला अटक झाली होती.

सध्या तो जामीनावर होता. या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सदर घटनेबाबत पेण पोलीस अधिक तपास करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.