Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक…लग्नाच्या हळदीचे ओले हात; अन नववधू सोबत गाडीत बसताच नवरदेवाने सोडली जन्माची साथ!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर

ब्रम्हपुरी तालुक्यात असलेल्या आवळगाव येथे लग्न समारंभा नंतर वर वधूला गाडीत बसवून स्वगावी नेत असतांना अचानक वराची प्रकृती खराब झाल्याने उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच वराने अखेरचा श्वास घेतल्याने आयुष्याचे स्वप्न पाहिलेल्या वधूवराच्या स्वप्नाची राख रांगोळी झाल्याची एक अत्यंत दुःखद दुर्दैवी घटना उपस्थितांच्या  डोळ्यासमोर घडल्याने गावात एकच शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ब्रम्हपुरी दि.१५ एप्रिल: लग्न ही वधूवर आणि त्या दोन कुटुंबासाठी एक खास गोष्ट आहे. लग्नामुळे दोन जीव आयुष्यभरासाठी एकत्र येतात. लग्न म्हणजे सात जन्माचे बंधन असं म्हणत लग्नाची अपरिहार्यताही बऱ्याचदा व्यक्त होते. लग्नाशिवाय राहिलेल्या माणसाकडे समाज वेगळ्या नजरेने बघतो. प्रत्येकाचं लग्न वयात आल्यानंतर त्याच वयात लग्न करून यशस्वी झाले पाहिजे. ही सर्वांची अपेक्षा असते. लग्नाच्या बंधनात सामाजिक चालीरीती नुसार माणूस विवाह बंधनात बांधल्या जाऊन संसार रुपी गाडा चालवतो. कधीकधी निसर्गनियमानुसार पती-पत्नी दोघेही एकमेकाला अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतात तर दुर्घटनेत, आजारात साथ सोडून जातात. प्रत्येक वर-वधू लग्नानंतर सात जन्म एकत्र राहण्याचे स्वप्न रंगवीत असतात आणि हे तेवढेच सत्य असून तरुण वयापासून तर वयोवृद्ध होत पर्यंत कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांची साथ असावी हीच अपेक्षा प्रत्येकांची असते.

मिळालेल्या माहितीनुसार सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी वासेरा येथील वर नाजूक अभिमन्यू पोहनकर आणि आवळगाव येथील वधू दिपाली यांचे रिती रिवाजाप्रमाणे मुला मुलीला दाखविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मुला मुलीची पसंती स्पष्ट झाल्यावर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. दोन्ही कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही कुटुंबाने एकत्र येऊन एकमेकांचे दाग, दागिने, कपडेलत्ते घेण्याचा कार्क्रमही उरकला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सद्या देशभरात कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने शासनानी दिलेल्या अटी शर्तीप्रमाणे कमीत कमी (५०) लोकांना लग्नात साक्ष ठेऊन आज दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता आनंदात लग्न सोहळा पार पडला. आलेल्या पाहुण्याचा जेवणाचा पाहुणचारही झाला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर दुपारी ठीक तीन वाजता च्या दरम्यान रितीरिवाजानुसार वर आपल्या वधूला स्वगावी नेण्यासाठी वधू सह वाहनात बसताच वराची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी ब्रह्मपुरीला दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी नाजूक अभिमन्यू पोहनकर यांना आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी हलविण्याच्या सूचना करताच ब्रह्मपुरी वरून आरमोरी ला नेत असतांना वाटेतच वर नाजूक अभिमन्यू पोहनकर याने अखेरचा श्वास घेतल्याने नववधू दिपालीने संसाराचे जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नाचा चकनाचूर झाल्याने दिपाली च्या अंगाची हळद ओलीची ओलीच राहिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.