Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेमडेसिवीरच्या अपुऱ्या पुरवठ्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निकाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • नागपूर शहर, भंडारा आणि अकोला जिल्ह्याला तात्काळ रेमडेसिवीर लस पुरवठा करण्याबाबत नायालयाचे राज्य सरकारला आदेश.
  • नागपूर शहर १५०००, भंडारा – २००० व अकोल्याला ३००० रेमिडेसिवर इंजेक्शन पुरवठा करण्याचे आदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. २ मे:  ऍड. वैभव भुरे यांनी भंडारा जिल्ह्याला रेमडेसिवीरचा योग्य तितका साठा पुरवला जात नाही आहे. हि महत्त्वाची बाब उच्च न्यायालयानी दखल घेतलेल्या जनहित याचिका मध्ये मांडली. भंडारा जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या बघता, रेमडेसिवीरचा पुरवठा हा अतिशय अल्प आहे. हि वस्तूस्थिती मागील दिवसांचे आकडे देऊन उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उच्च न्यायालयानी याची त्वरित दक्षता घेउन, भंडारा जिल्ह्यासाठी तात्काळ २००० रेमडेसिवीरच व्हायल (Remdesivir Vials)  उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारला निर्देश दिले. यामुळे भंडारा जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार मोठा दिलासा मिळणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.