Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कौशल्य विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत विविध कोर्समध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १० मार्च: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन अंतर्गत विविध कोर्सेसमध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षणाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली फोन. क्रमांक ०७१३२-२२२३६८ या कार्यालयाशी किंवा पुढील दिलेल्या प्रशिक्षण केंद्राशी त्वरीत संर्पक साधावा.
प्रशिक्षण केंद्राचे नांव- १) एन.डी. जेम्स, बल्लारपूर,जि. चंद्रपूर GemsStoneProcessing cum polising श्री. गुल्हाने, ९४२१९२६१४०,९६२३९१३१७१, २) पार्कसन स्किल, धंतोली, नागपूर Bedside assistant संगिता मॅडम- ९१७५९७२५९६, ऋतिका मॅडम-७५५८७५३५३३, ३) कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली BROILER POULTRY/ MUSHROOM CULTIVATION , कदम साहेब ,९८६९४७८८५९, असे आवाहन प्र.वा.खंडारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

Comments are closed.