Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात आतापर्यंत 51 हजार 650 कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, डेस्क २1 जानेवारी :- राज्यात आज 267 केंद्रांवर 18 हजार 166 (68 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार आणि आज बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण 51 हजार 660 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात आज ३१२ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण ८८१ जणांना ही लस देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.