Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निशुल्क आरोग्य महाशिबिराला बेंबाळ येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो लाभार्त्यानी महाशिबिराचा घेतला लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बेंबाळ 13 नोव्हेंबर :-  मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या संकल्पनेतून स्वर्गीय लोडबाजी पाटील वाढई व कमलाबाई लोडबाजी पाटील वाढई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथे नागपूर व चंद्रपुरातील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत निशुल्क महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.
बेंबाळ व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन तथा औषधोपचार मिळावे या उद्देशाने भव्य निशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता पासून झाली. या शिबिरामध्ये न्यूरोसर्जन, शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, दंतचिकित्सक, चर्मरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, आयुर्वेद तज्ञ, हृदयरोगतज्ञ, किडनी सर्जन, जनरल फिजिशियन, नाक कान घसा तज्ञ इत्यादी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना तपासून मार्गदर्शन दिले व औषध उपचार दिला. मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी करून या महा शिबिराचा लाभ घेतला. या महा शिबिराला यशस्वीरिता आयोजक म्हणून दिपक पाटील वाढई डॉक्टर कुंदन वाढई तसेच परिवर्तन पॅनलचे सर्व सदस्य, विवेकानंद विद्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य दिले.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.