Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बनावट नोटा प्रकरणी ठाणे पोलिसांकडून भामट्याला।अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे 13 नोव्हेंबर :-  भारतीय चलनातील २००० /- रु चलनी दराच्या ८ कोटी रूपये दर्शनी किंमतीच्या बनावट नोटा विक्रीसाठी
आलेल्या ०२ आरोपींना ठाणे शहर गुन्हे शाखा, घटक- ५ कडून जेरबंद करण्यात यश आले आहे. दि. ११/११/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम) येथे दोन इसम इनोव्हा कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा छापून विक्री करण्याकरीता येणार आहेत अशी खात्रीलायक बातमी गुन्हे शाखा, घटक ५ चे वरिष्ठ पो. निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ टिम गठीत करण्यात येवून, गायमुख चौपाटी, जी. बी. रोड, ठाणे  येथे सापळा लावून बातमीमधील आशया प्रमाणे १०.४० वा. चे सुमारास आरोपी राम हरी शर्मा वय ५२ वर्षे राह. एम / ६०३, पेनिन्सुला पार्क, न्यु विवा कॉलेज रोड, बोळींज, विरार वेस्ट, डी. मार्ट जवळ, पालघर, राजेद्र रघुनाथ राऊत, वय ५८ राह. परनाई नाका, शिवप्रभा हॉटेल समोर घर नं. २१९ कुरगांव, ता. जि. पालघर यांना इनोव्हा गाडी नं. एम. एच ०४ डीबी ५४११ सह शिताफीने ताब्यात घेतले असता, त्याचे कब्जात रू. २,०००/- दराच्या वेगवेगळया नंबरच्या नोटा असलेले एकूण ४०० बंडल एकूण रू.८,००,००,०००/- दर्शनी किं. (आठ कोटी) च्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी।सांगितले की, सदरच्या बनावट नोटा इसम मदन चौहान याचे मदतीने पालघर येथील गोडावून येथे छापुन त्या बनावट नोटा विक्री करण्याकरीता आले आहोत. त्यावरून नमुद आरोपींचे विरुध्द सहा. पो. निरी. अविनाश रामदास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन ३७३ / २०२२ भा.द.वि. कलम ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क), ३४ अन्वये दिनांक  गुन्हा दाखल करण्यात आला .
गुन्हयांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर, नेमणूक गुन्हे शाखा, घटक ५, हे करीत आहेत. यातील बनावट नोटा या आरोपी क्र १ राम हरी शर्मा यांचे।पालघर येथील टेक इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाळयामध्ये संगणक व प्रिन्टरच्या सहाय्याने बनविल्या असल्याची
माहीती मिळत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.