५० वर्षांच्या कर्मचाऱ्यांना एसटी बसविणार घरी
संमतीपत्र सादर करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू
नागपूर, दि. १६ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आणखी कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता वयाची ५० वर्षे झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना घरी बसविण्याची योजना आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे. ज्यांनी ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण केली, त्यांना या योजनेमध्ये पात्र ठरविण्यात आले आहे. स्वेच्छानिवृत्तीस पात्र असणारे कर्मचारी संबंधित अधिकाऱ्यांकडे संमतीपत्र सादर करावे लागणार आहे. एस.टी. महामंडळातर्फे तसे फर्मान जारी करण्यात आले आहे.
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचे लाभ देय राहणार आहे. त्यामध्ये भविष्य निर्वाह निधी, उपदान, रजा रोखीकरणाचा समावेश राहणार आहे. ही योजना स्वीकारणाऱ्याचे अपराध प्रकरण प्रलंबित असल्यास ते पंधरा दिवसांच्या आत संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून पूर्ण निकाली काढण्यात येईल. स्वेच्छासेवानिवृत्ती स्वीकारणारे अधिकारी, कर्मचाNयांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रमाणेच मोफत कौटुंबिक पास देण्याची योजना लागू राहणार आहे. सदर स्वेच्छासेवानिवृत्ती योजना ही राज्यशासनाच्या मान्यतेनंतरच कार्यान्वीत होईल, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
(हे वाचा – आज चे सोने-चांदीचे दर)
Comments are closed.