Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुद्रांक शुल्क दस्त नोंदणीच्या सवलतीमध्ये ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. २३ डिसेंबर:  राज्यात कोरोनामुळे मालमत्ता खरेदीसंदर्भातील मुद्राक शुल्कांमध्ये राज्य शासनाने दोन टक्के दराने सवलत दिली होती. आता दि. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ यादरम्यान नोंदणी शुल्कामध्ये १.५ टक्के दराने सवलत देण्यात आली असल्याचे सह जिल्हा निबंधक अशोक उघडे यांनी कळविले आहे.

       राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्री करारपत्राच्या दस्तऐवजावर या अधिनियमान्वये आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्कावर  ही सवलत देण्यात येत आहे.  तथापि दस्त निष्पादनाच्या दिनांकास मुद्रांक शुल्क भरल्यानंतर असे मुद्रांकीत दस्तनोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादनापासून चार महिन्यापर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क लावून निष्पादित केलेल्या दस्तऐवजांना पुढील चार महिने मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळणार असल्याने पक्षकारांनी कोरोना संक्रमणकाळात दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.