Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची, राज्य मंत्रीमंडळ बैठकीत आज मान्यता

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई: जलसंपदा विभागांतर्गत, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आज देण्यात आली. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा देण्यात येणार आहे. गृह विभागांतर्गत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता ३४६ नवीन पद निर्मिती करण्यासाठी आणि त्यासाठीच्या खर्चालाही आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तर सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच राज्यातल्या रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेडला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आज मान्यता देण्यात आली.
त्यासोबतच जळगांव जिल्ह्यामधल्या चाळीसगांव तालुक्यातल्या वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस आज मान्यता देण्यात आली. तर चाळीसगाव, भडगाव तालुक्यातल्या ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा देण्याला मंजुरी देण्यात आली. तर महसूल विभागांतर्गत पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.