रस्तेकामांतील ढिलाई थांबवा; गुणवत्तेवर तडजोड नाही – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा कडक इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम यंत्रणांना त्यांनी स्पष्ट सांगितले की, “कामाची गुणवत्ता आणि मुदत या दोन्ही बाबतीत तडजोड होणार नाही; जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल.”
जिल्ह्यातील प्रमुख रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना अविश्यांत पंडा यांनी विलंबाचे कारण न सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यात २९५ किमी तर राष्ट्रीय महामार्ग विभागाने ५४६ किमी रस्त्यांची माहिती दिली; मंजुरी मिळाल्यानंतरही अनेक कामे वर्षभर सुरू न झाल्याचे लक्षात आले. काही कामांसाठी वन विभागाची अडचण असल्याचे सांगितले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की “वन विभागाकडून अडचण नाही; केवळ समन्वयाच्या अभावामुळे कामे अडकली आहेत. अनावश्यक कारणे देणे थांबवा आणि तातडीने पाठपुरावा करा.”
ट्रिफॉलिंगमुळे अनेक ठिकाणी काम सुरू न झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “अपूर्ण कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अडचण नसलेल्या ठिकाणी काम तात्काळ सुरू करा.” वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई होण्याचे निर्देश दिले गेले असून, मुदतवाढ देताना ही कारवाई कठोर स्वरूपाची राहावी असेही सांगितले.
जिल्हाधिकारी पंडा यांनी बांधकाम गुणवत्तेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली; “गुणवत्तेची कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. दोषींवर थेट कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. महसूल मंडळांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासी गाळ्यांच्या दुरुस्तीवरही निर्देश देऊन, काम तातडीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..