Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली वैद्यकीय विभागाच्या कामकाजाची माहिती

उन्हाळी शिबीराचे गोंडवाना विद्यापीठाने केले आयोजन

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 24 जुन – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठात उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम (SIP) चे आयोजन करण्यात आले होते. या उन्हाळी शिबिरादरम्यान विद्यापीठातील विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शैक्षणिक भेटी देत असतात. या इंटर्नशिपला जळगाव, गोंदिया, यवतमाळ, नागपूर येथील वैद्यकीय विद्यापीठांमधून विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठात आले होते.

या इंटर्नशिप कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सर्च प्रकल्प, एस.टी.आर.सी (गोंडवाना विद्यापीठ), पोर्ला हर्बल प्रोजेक्ट, सिव्हील हॉस्पिटल आणि महिला हॉस्पिटल, गडचिरोली तसेच कुरखेडा येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या प्रकल्पास भेटी दिल्या. याअनुषंगाने, विद्यार्थ्यांना भेटी दिलेल्या ठिकाणी ओपीडी आणि विविध वैद्यकीय विभागांमध्ये काम कसे चालते ते जवळून बघण्याची आणि प्रक्रिया समजावून घेण्याची संधी मिळाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठातील सायन्स व टेक्नोलोजी सेंटरमधील वैदुंकडून आयुर्वेदिक पद्धतीने केले जाणाऱ्या उपचारांविषयी माहिती जाणून घेतली. सदर इंटर्नशिप दरम्यान विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे मार्गदर्शन लाभले. या इंटर्नशिपला यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक (प्र.) तथा सहा. प्राध्यापक डॉ. प्रिया गेडाम, डॉ. सविता गोविंदवार आणि डॉ. चैतन्य शिनखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.