Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोबाईलवर मिस यु ऑल असे स्‍टेटस्‌ ठेवून आत्‍महत्‍या…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापूर, 14, सप्टेंबर :- वर्षभरापुर्वी लग्‍न झाले. लग्न झाल्यानंतर वर्षभरातच पत्नीपासून विभक्त झाल्‍याने सतत नैराश्‍येत असलेल्‍या युवकाने टोकाचे पाऊल उचलले. मोबाईलवर मिस यु ऑल असे स्‍टेटस्‌ ठेवून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना उघड झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडीतील येथील सदर घटना आहे. अरुण येडवे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी बऱ्याच दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे तो काही दिवसांपासून तणावाखाली होता. पत्नीसोबत राहत नसल्याने नैराश्यातून युवकाने मोबाइलवर ‘मिस यू ऑल ऑफ यू’चा मेसेज स्टेटसला ठेवत गाव शिवारात शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेनंतर मयत अरुण याचा भाऊ रवींद्र येडवे यांनी कामती पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्याचा मृतदेह गावालगत प्रभाकर शेळके यांच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मत्‍स्‍यव्‍यवसायासाठी जलाशय ठेक्‍याने देण्‍यासाठी सुधारित धोरणात राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल या तत्‍वाचा समावेश करण्‍यात येणार…

लम्पी आजाराबाबत संबधितांनी सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी गडचिरोली

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.