Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉकडाऊनमुळे त्रस्त होऊन वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १७ एप्रिल: आलापल्ली वरून एटापल्ली जाणाऱ्या महामार्गावर मद्दीगुडम गावाजवळील जंगल परिसरात एका वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली आहे.

मोतीराम लक्ष्मण गेडाम (६०) रा. आलापल्ली असे मृतकाचे नाव असून गेल्या सोमवारी १२ एप्रिल २०२१ रोजी घरातून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्याने घरी उपासमारीचे चटके असून घरची हलाखीची परिस्थिती असून घरी पत्नी, एक अपंग मुलगा असून लॉकडाऊन मूळेकाम धंदा नाही या कारनाने कंटाळून घर सोडून बाहेर गेला. पत्नीने शोधाशोध केली असता मिळाले नाही. दरम्यान १६ एप्रिल २०२१ रोजी एटापल्ली मार्गावरील जंगल परिसरात आलापल्ली रेंज कंपार्टमेंट २४ मध्ये मोतीराम यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर घटनेची माहिती अहेरी पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त होताच अहेरी पोलीस निरीक्षक प्रवीण  डांगे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब शिंदे ,पि एस आय आरती नारोटे पोलीस हवालदार साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत व्यक्तिची ओळख पटल्यावर त्या मृत शरीराचे शव विच्छेदन करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास अहेरी पोलीस करित आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.