Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलाला अपहरण करून केले गंभीर जखमी, आरोपी फरार

  •  सुज्ञ नागररिकांच्या सजगतेमुळे अपहरण झालेल्या मुलाचे वाचले प्राण.

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नांदेड, दि. १७ एप्रिल: नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील १० वर्षीय मुलाला लोखंडी रॉडने गंभीररीत्या जखमी करून अपहरण करणाऱ्याचा कट सुजाण नागरिकांनी हाणून पाडला.

आरोपीला बडूर येथील सुज्ञ ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याची कार बिलोली तालुक्यातील बडूर येथे बंद पडली. दरम्यान त्या गाडी मधून छोट्या मुलाचा रडण्याचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी गाडीकडे धाव घेतली त्यावेळी सदर गाडीत ओंकार हा जखमी अवस्थेत आढळला. परंतु त्या दरम्यान आरोपी महेश बोईनवाड हा पसार झाला होता. सदर जखमी बालक व गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार बिलोली पोलिसांनी ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या बालकास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.