Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या !

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  20 ऑक्टोबर :-  दक्षिण मुंबईतील एक प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी त्यांच्या राहत्या घराच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दक्षिण मुंबईतील लालबाग- काळाचौकी विभागात ते समाजसेवक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी या भागातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील लढवली होती.

मुंबईत प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी घेत पोरवाल यांनी आयुष्य संपवलं. दक्षिण मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बिल्डर म्हणून पारस पोरवाल यांची ओळख होती. मात्र त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोरवाल यांच्याजवळ कुठलीही सुसाईड नोटही सापडलेली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भायखळा येथील राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरील घरातून सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास पोरवाल यांनी उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने पोरवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसंच बिल्डर वर्तुळातही या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पारस पोरवाल यांनी दक्षिण मुंबईत अनेक इमारती बांधल्या आहेत.

दरम्यान, पोरवाल यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, व्यावसायिक भागीदार यांच्याकडे चौकशी केली जात आहे. ते कुठल्या तणावात होते का, त्यांना कुठल्या गोष्टीची चिंता सतावत होती का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.