Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘आपण यांना पाहिलंत का? शोधून आणणाऱ्यास ११ रू बक्षीस !’ 

भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्याची बॅनरबाजी,  पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 20 ऑक्टोबर :- मागील काही दिवसांपासून जाधव विरूध्द राणे हा वाद विकोपाला गेला आहे. दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना भिडत असून यात काल अजून एक वादाची ठिणगी पडली आहे. ती म्हणजे जाधव यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यानी आपण यांना पाहिलंत का? शोधून आणणाऱ्यास अकरा रूपयांचे बक्षीस ! अशा स्वरूपाची बॅनरबाजी केली आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच कायदा व सुव्यवस्थेचे भान राखत हे बॅनर काढले आहेत.

मुंबईतील माहीम परिसरात भाजपकडून भास्कर जाधव यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘आपण यांना पाहीलात का ? शोधून आणणाऱ्याला ११ रू बक्षिस’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्यामुळे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजपा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्या विधानामुळे कोकणातील राणे समर्थक देखील संतापले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशातच मंगळवारी रात्री जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. शिवाय जाधव यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर हा हल्ला झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. दरम्यान जाधव विरुद्ध राणे हा वाद काही कमी होण्याचं दिसतं नाहीये. कारण मुंबईत भाजपकडून आता भास्कर जाधव यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहीलात का ? शोधून आणणाऱ्याला ११ रू बक्षिस अशा आशयाचे बॅनर लावत जाधवांच्या वक्तव्याचा निषेध भाजपकडून करण्यात येत आहे

आपण यांना पाहिलंत का ? शोधून आणणाऱ्यास अकरा रुपयांचे बक्षीस…!’ अशा आशयाचे बॅनर शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात काल रात्री मुंबईतील माहीम परिसरात लावण्यात आले होते. मात्र, कायदा-सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने रात्रीचे हे बॅनर हटवल्याची माहिती समोर आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

मुंबईत तीन ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याची धमकीचा निनावी फोन

 

Comments are closed.