Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तात्पुरत्या फटाका विक्री परवानाधारंकानी फटाका विक्री परवान्यासाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 20 सप्टेंबर :-  गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तात्पुरता फटाका साठवणुक व विक्री परवाना घेणाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे की, आगामी दिवाळी सणानिमित्य ज्यांना तात्पुरता फटाका साठवणुक व विक्री परवाना (पंधरा दिवसाच्या मुदतीकरीता) आवश्यकता आहे. त्यांनी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयात दिनांक 07 ऑक्टोंबर 2022 पूर्वी आपला अर्ज विहित नमुण्यात सादर करावेत. वरील मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व तात्पुरत्या फटाका साठवणुक व विक्री परवानाधारकांनी फटाका साठवणुक व विक्री परवान्यासाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
अर्जासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.यात पोलीस अधिक्षक,गडचिरोली,संबंधित तहसिलदार,नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायत यांनी अर्जदारांचे विनंती वरून Explosive Rules,2008 मधील अटी व शर्ती तसेच काविड-१९ बाबत शासनाद्वारे वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन संबंधितास ना हकरत प्रमाणपत्र त्वरीत निर्गमित करावे .

आवश्यक कागदपत्र यात विहीत नमुन्यातील अर्ज (Form AE-5 मध्ये),पोलीस अधिक्षक यांचे कार्यालयातून तात्पुरता फटाका परवाना मंजूरीसाठी चारीत्र्य प्रमाणपत्र, संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयातून तात्पुरत्या फटाका परवाना मंजूरीबाबत अहवाल व ना हरकत प्रमाणपत्र,नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचयतीचा अहवाल व ना हरकत प्रमाणपत्र, ज्या जागेवर फटाका विक्री करणार आहेत त्या ठिकाणच्या जागेचा/इमारतीचा नकाशा व अभिलेख, इमारत / खुली जागा स्वत:च्या मालकीची नसल्यास जमीन मालकाचे /घरमालकाचे संम्मतीपत्र,अर्जदाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड, सोबत जोडावे, असे जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.