Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! दोन दुचाकींची समोरासमोर धडक, १० वर्षीय बालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील तळवे रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तुळाजा येथील ३ व तळोदा येथील २ असे एकूण ५ जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. अपघातात एका आई आणि लेकाचा तर एका बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली एकमेकांना धडकल्या. मुलाचे आधार कार्ड अपडेटसाठी तळोदा येथे आलेले कुटुंब आपले कामे आटोपून तुळाजाकडे जात असतांना हा अपघात घडला. दरम्यान या अपघातात दारासिंग छगन जाभोरे (४८), मदन दिवळ्या नाईक (५०), अमित मदन नाईक (१०) हे जागीच ठार झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बोरद येथून शेतीचा मोजनीचे कामे आटोपून उमेश शांतीलाल चव्हाण दुचाकीने आई व पत्नी सोबत तळोदा येथे परतत होते. अपघातात उमेश शांतीलाल चव्हाण व सोबत असलेली त्याची आई सुनंदा चव्हाण यांना गंभीर मार लागला. पूजा उमेश चव्हाण यांना मुक्का मार लागला. यांना उपचारासाठी तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान उमेश शांतीलाल चव्हाण (३०) आणि सुनंदा चव्हाण या मायलेकाचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली ब्रेकिंग: मुसळधार पावसाने गोविंदपूर पुलानजीक असलेला रपटा गेला वाहून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.