Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी समाजाने केली मानवी साखळी

ठाणे शहर आणि कळवा भागात आगरी समाजाने केली मानवी साखळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :  नवी मुंबई विमानतळाला आगरी समजाचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी करत ठाण्यात ठाणे शहर आणि कळवा भागात आगरी समाजाने मानवी साखळी तयार करुन आपला निषेध नोंदवला आहे.  कारण नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव आल्याने या प्रस्तावाला विरोध करण्याकरता आगरी समाजाने आज ठिक ठिकाणी मानवी साखळी करुन आंदोलन केले.

या आंदोलनाला भाजप आणि मित्रपक्षांनी पांठिबा दिला असून या आंदोलनात भाजपा आणि मित्र पक्षाचे राजकीय नेते तसच कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

sakhali uposhan2

दि बा पाटील यांच्या नावाची वर्णी लागावी यासाठी राज्य सरकारने भूमीपुत्राच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे असे भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी यावेळेस सांगितले.  त्यामुळे ठाण्यात विविध ठिकाणी आशा प्रकाच्या मानवी साखळी करून आंदोलक रस्त्यावर उतरले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माजी आमदार, माजी खासदार रायगडचे भूमिपुत्र नेते दिवंगत दि, बा, पाटील यांचे नवी मुंबईच्या उभारणीत आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान असून, नवी मुंबई, रायगड या भागात त्यांनी केलेले कार्य हे वाखाडण्या जागे आहे.

दि. बा. पाटील यांचे सामाजिक योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे ही मागणी स्थानिक भूमीपुत्रांनी केली आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक! ट्रॅक्टरखाली चिरडून १५ वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार

एकामागोमाग एक महिला पडल्या ‘त्या’ मॅनहोल मध्ये, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने बचावले थोडक्यात

 

Comments are closed.