Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व राहण्यासाठी प्रयत्न करणार – नाना पाटोले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २३ जानेवारी: राज्यात कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही, पण यासाठी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पटोले यांनी एक मोठे विधान देखील केले आहे. ‘राज्यात स्वबळावर कॉंग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार आहे’, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी पटोले म्हणाले पक्ष देईल ती जबाबदारी पार पडण्यास तत्पर आहोत, आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मला मिळेल ती प्रामाणिकपणे पार पडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्त्तेत कसा येईल आणि त्यानिमित्याने महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचे काम कॉंग्रेस पक्षाकडून केले जाईल, असे नाना पटोले म्हणाले.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.