Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशाला 23 जून पर्यंत मुदतवाढ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 12 जून – केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13 जागा व आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/ सोलापूर / मुंबई / औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दिनांक २० जून २०२३ पर्यत मागविण्यात आलेले होते. त्यास दिनांक २३ जून २०२३ पर्यत केंद्र शासनाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार मुदतवाढ देण्यांत आलेली आहे. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक २३ जून २०२३ पर्यंत संबधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालय यांचेकडे सादर करावे.

प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगीक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http://www.directortextilesmah.in/main.php वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योगयांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे मा. आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, मा. एम. जे. प्रदिप चंदन, भा.प्र.से, यांनी कळविलेले आहे. विदर्भातील 11 जिल्हयातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर. प्रशासकीय इमारत क्रं. 2, ८ वा माळा, “बि” विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर 440001 दुरध्वनी क्रमांक 0712-2537927 यांचे कडून प्राप्त करून घ्यावी. तसेच अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे असे प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांनी कळविलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.