Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जालन्यात निर्बंध वाढले

  • जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांची पकडून केली जात आहे अँटीजन टेस्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १९ एप्रिल: जालना शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाने अत्यावश्यक सेवेत नव्याने निर्बंध लावले आहेत. मात्र तरीही रस्त्यावर नागरीक विनाकारण चकरा मारत असल्याने आज शहरातील अंबड चौफुली भागात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांना पकडून त्यांची अँटीजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी पॉझिटिव्ह आढळलेल्या ५ नागरीकांना उपचारासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पाठवण्यात आलं असून निगेटिव्ह आलेल्या नागरीकांना विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही कारवाई दररोज केली जाणार असून अशा प्रकारची कारवाई आता जिल्हाभरात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.