Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिसांनी दोन दिवसात केला वजिराबाद येथील घरफोडीचा उलगडला

स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कामगीरी, 17 लाख 41 हजार 400 रूपए जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 03 नोव्हेंबर :- सन्मान प्रेस्टीज, वजिराबाद नांदेड येथील ऑफिसमध्ये झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलिसांनी दोन दिवसात उलगडा करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवदास पुरभाजी सोनटक्के (21) रा. बागमार गल्ली मुदखेड आणि अंकुश पांडूरंग मोगले (20) रा. धनगर गल्ली मुदखेड असे आरोपींचे नाव आहेत.

सविस्तर माहिती अशी की, 30 ऑक्टोबरच्या रात्री सन्मान प्रेस्टीज, वजिराबाद नांदेड येथील ऑफिसच्या बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून 22 लाख 15 हजार 470 रूपयांची चोरी होण्याची तक्रार नंदकुमार गाजुलवार रा. चौफाळा नांदेड यांनी वजिराबाद ठाण्यात केली. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेउन अटक करण्याचे निर्देश नांदेड पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थागुशा नांदेड पोलीस निरीक्षक यांना दिले. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थागुशा पथकाने घटनास्थळ आणि आसपासचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून तपास सुरू केला. आरोपी मुदखेड येथे असल्याची खात्रीदायक माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुदखेड रेल्वेस्टेशन परिसरात जावून आरोपींचा शोध घेवून आरोपी शिवदास सोनटक्के, अंकुश मोगले या दोघांना अटक केली. आरोपींना गुन्ह्यासंबंधी विचारपुस केली असता शिवदास सोनटक्के यांच्या घरून 13 लाख 41 हजार 400 रूपए आणि अंकुश मोगले याच्या कडून 4 लाख रूपए असा एकुण 17 लाख 41 हजार 400 रूपए जप्त करण्यात आले. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा पथकाद्वारे सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्थागुशा चे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि पांडूरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहु, संजय केंद्र, गुंडेराव करले, गंगाधर शंकर म्हैसनवाड, सखाराम नवघरे, अफजल पठाण, विठ्ठल शेळे, देविदास चव्हाण, तानाजी येळगे, गणेश धुमाळ, कलीम, हेमंत बिचलेवार, पंचफुला फुलारी, दिपक ओढणे, राजू सिटीकर यांनी केली आहे.

हे देखील वाचा :-

Comments are closed.