Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विधानसभेच्या 7 जागांसाठी 6 राज्यांमध्ये मतदान

अंधेरी पोटनिवडणूकीकडे सर्वांची नजर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 03 नोव्हेंबर :-  देशात आज गुरूवारी विधानसभेच्या 7 जागांसाठी 6 राज्यात पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या 6 राज्यांपैकी 3 ठिकाणी भाजप, भाजप युतीचे सरकार आहे आणि उर्वरित 3 ठिकाणी प्रादेशिक पक्षाचे किंवा त्यांच्या आघाडीचे सरकार आहे. उत्तर प्रदेश मधील गोला गोकरनाथ, बिहारमधील गोपालगंज आणि मोकामा, तेलंगणातहल मुनुगोडा, हरियाणातील आदमपूर, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व आणि ओडिशातील धामनगर विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक असून आज मतदान होत आहे. अंधेरी पोटनिवडणूकी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ठाकरे गटाकडून मैदानात आहेत. त्याच्या विरोधात अपक्ष मिलिंद कांबळे सह सात अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. मतदानासाठी 1 हजार 600 कर्मचारी आणि 1 हजार पोलीस तैनात करण्यात आले असून 2 लाख 71 हजार मतदार आहेत. सकाळी 7 वाजे पासून मतदान सुरू झाले आहे.

हरियाणातील आदमपूर विधानसभा मतदार संघ पाच दशकांपासून भजनलाल कुटूंबाचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारमधील ही पहिलीच निवडणूक चाचणी आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूने भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर बिहारमध्ये पहिली पोटनिवडणूक होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भाजपा उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथ जागा राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सत्ताधारी बीजेडी-शासित ओडिशातील विद्यमान आमदाराच्या निधनामुळे रिक्त झालेल्या धामनगर जागेवर सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी दिवंगत आमदाराच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तेलंगणातील मुनुगोडा जागेवर भाजप आणि सत्ताधारी टीआरएस ने आक्रमक प्रचार केला आहे. काॅंग्रेस आमदाराच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती आणि आता ते पुन्हा भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत.

भजनलाल यांचा मुलगा कुजदीप बिश्नोई याच्या राजीनाम्यामुळे हरियाणाच्या आदमपुर जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये कुलदीप ने काॅंग्रेसचा राजीनामा देउन भाजप मध्ये प्रवेश केला होता. या जागेवरून विष्णोई यांच्या मुलगा भव्य भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. आदमपूर ही जागा 1968 पासून भजनलाल कुटूंबाकडे आहे आणि दिवंगत मुख्यमंत्र्यांनी नउ वेळा, त्यांच्या पत्नी जस्मादेवी यांनी एकदा आणि कुलदीप यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. या पोटनिवडणूकीत काॅंग्रेस, आयएनएलडी आणि आप ने आपले उमेदवार मैदानात उतरविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बिहार विधानसभेच्या मोकामा आणि गोपालगंज या दोन जागांवर पोटनिवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही जागांवर सत्ताधारी महाआघाडीत सहभागी असलेले राजद आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मोकामा जागा आधी आरजेडी आणि गोपालगंज भाजपच्या ताब्यात होती. भाजप प्रथमच मोकामा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मागील निवडणूकीत त्यांनी ही जागा मित्रपक्षांसाठी सोडली होती. या जागेसाठी भाजप आणि आरजेडी या दोन्ही पक्षांनी बाहुबलीच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. मोकाममध्ये भाजप ने अनंत सिंह यांना विरोध करणार्या स्थानिक बाहुबली लालन सिंह यांच्या पत्नी सोनम देवी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून आरजेडीने अनंत सिंह यांच्या पत्नी निलम देवी यांना मैदानात उतरविले आहे.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.