Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई डेस्क, दि. 1८ डिसेंबर : राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी व नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावुन घेण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी दिले.

            महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार प्रतिभा धानोरकर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ‘महाजेनको’ चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती प्रगतकुशल कृती समितीचे सभासद उपस्थित होते.

            ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घेण्यात यावे व करार पद्धतीच्या अंतर्गत मिळत असलेले मानधन देण्यात यावे. याचबरोबर कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती द्यावी. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी दहावी तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परिक्षेसाठी विशेष प्रशिक्षण द्यावे अथवा त्यांच्या शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करण्यात यावे, असे डॉ.राऊत यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

            ज्या शेतकऱ्यांची चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी आहे, ते शेतकरी थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून नव्या दराप्रमाणे पुढील वीज देयक अदा करण्यास तयार असतील अशा शेतकऱ्यांना तातडीने दिवसा वीज जोडणी देण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ.राऊत यांनी दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.