Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शाळेच्या बसला अचानक आग, मात्र विद्यार्थी बचावले

खारघर येथील घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी मुंबई  12 सप्टेंबर :-  शाळेच्या बस ना अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी वसई पूर्वेला शाळेची एक बस कलंडल्यामुळे अपघात झाला होता. सुदैवाने त्यावेळी जीवित हानी झाली नाही. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर मधील एका शाळेच्या बसने पेट घेतला. बसमधून धूर बाहेर पडत आहे, हे पाहून मुले घाबरली, व जिवाच्या आकांताने ओरडू लागली.मात्र चालकाने प्रसंगवधान राखत बस मधील तीन मुलांना सुखरूप बाहेर काढले. मोठी दुर्घटना टळली.

सीबीडी बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेची ही बस होती. दुपारच्या सुमारास विध्यार्थी घेऊन ही बस सेक्टर १५ येथील घरकुल सोसायटी मधून निघाल्यावर गुडविल इमारती जवळ येताच या बसच्या आतून धूर येऊ लागला. बसमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे हे लक्षात येताच चालकाने प्रसंगवधान राखत क्लिनरच्या मदतीने बस एका बाजूला आणली. आणि बसमधील तिन्ही मुलांना सुखरूपपणे बाहेर काढले. यामुळे स्कूल बसचे मालक आपल्या गाड्यांची व्यवस्थित देखभाल ठेवत नाहीत, त्यामुळे विध्यार्थ्यांची सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.