Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून आई व मुलगा जबर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

रायगड, दि. १४ सप्टेंबर : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सातघर येथील महेंद्र टिळक पाटील यांच्या घरांवर वॉल कंपाऊंडची भिंत कोसळल्याने घराची भिंत कोसळून आई संगीता महेंद्र पाटील व मुलगा कुणाल महेंद्र पाटील हे दोघे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

गेले दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान शेजारील वॉल कंपाऊंडची भिंत महेंद्र टिळक पाटील यांच्या घरांवर कोसळल्याने त्यांच्या घराची भिंत गाढ झोपेत असलेल्या घरातील आई संगीता पाटील मुलगा दीपेश व कुणाल यांच्या अंगावर कोसळल्याने ते जखमी झाले. त्यातील आई संगीता महेंद्र पाटील व कुणाल महेंद्र पाटील हे जबर जखमी झाल्याने त्यांच्यावर डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घराचा तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जुन्या व  जीर्ण झालेल्या घरांची योग्य ती खबरदारी घेऊन वास्तव्य करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शाळेच्या बसला अचानक आग, मात्र विद्यार्थी बचावले

Comments are closed.