Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत दुसऱ्यांदा प्लाज्मा दान शिबीर संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

●एकुण १५ दात्यांनी प्लाज्मा दान केले.

●चौघांनी केले दुसर्‍यांदा प्लाज्मा दान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी, दि. ११ एप्रिल:  अहेरी येथील कन्यका परमेश्वरी देवस्थान समिती, विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती, श्रीराम सेवा समिती व हेल्पींग हॅण्डस् फाऊंडेशन,चिराग फाऊंडेशन वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या प्लाज्मा दान शिबीरात एकुण १५ दात्यांनी प्लाज्मा दान केले.

      नागपुरच्या प्रसिध्द लाईफ लाईन ब्लड बँकेच्या तज्ञ चमुने प्लाज्मा संकलन केले. परिसरात कोरोनाचा पुन्हा वेगाने वाढलेल्या प्रादुर्भावामुळे गाजावाजा न करता सामाजीक अंतर, मास्क वापर अशा सर्व सुचनांचे पालन करीत सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

         चार दिवस अगोदर लाईन लाईनच्या चमुने कोवीड मधुन बाहेर पडलेल्या एकुण ४० व्यक्तींच्या रक्ताचे नमुणे तपासण्यास नेले. त्यात २४ व्यक्तींच्या रक्तात मुबलक प्रमाणात अॅन्टीबाॅडीज आढळले. त्यातील नितीन मद्देर्लावार,प्रशांत आईंचवार,राजीव बोंगीरवार,ढवळे सर,तानाजी मोरे,देवा वासाडे,नारायण सिडाम,राजेश मद्देर्लावार,आतिश दोंतुलवार,राजेश मुप्पावार,राहुल अनमलवार,प्रतिक मुधोळकर,राहुल दोंतुलवार,रवी नेलकुद्री, संतोष मद्दीवार या १५ व्यक्तींनी प्लाज्मा दान केले. यापैकी संतोष मद्दीवार, राजेश मुप्पावार, रवी नेलकूद्री व राजेश मद्देर्लावार यांनी दुसऱ्यांदा प्लाजमा दान केले.   

    या पुर्वीही डिसेंबर महिन्यात अहेरीत याच समुहाकडुन प्लाज्मा दान आयोजीत करण्यात आले होते तेव्हा सुध्दा १८ व्यक्तींनी प्लाज्मा दान केले होते. आज ४ दात्यांनी दुसर्‍यांदा प्लाज्मा दान केले आहे. एकीकडे सर्वत्र कोरोना मुळे भीतीचे वातावरण आहे मात्र अहेरीच्या नागरिकांनी प्लाज्मा दान करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. कोविड आजारातून बरे झालेल्यांनी आपला प्लाज्मा दान करून इतरांना जीवनदान देण्याचे आव्हान सर्व दात्यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.