Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाने केले गाईला ठार

तीन दिवस लोटूनही वन विभागाने केला नाही पंचनामा. स्थानिक नागरिकात रोष व्यक्त.

वन विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष. कोरची तालुक्यातील बोडेना नजीकची घटना. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरची,दि. २८ डिसेंबर :- तालुक्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या बोडेना येथील मनीराम हलामी यांच्या शेतात शिवरात अंताराम किंचक यांची गाय चराईसाठी गेली असता त्या गाईला वाघाने ठार केल्याची बातमी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देऊन सुद्धा तीन दिवसांनंतरही पंचनामा न केल्याने वनविभागाच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये रोश व्यक्त केला जात आहे. 

शनिवारी सायंकाळी तीन ते चारच्या दरम्यान बोडेना गावापासुन १ किमी अंतरावर असलेल्या शेतात चराईसाठी गेलेल्या गाईवर वाघाने हल्ला करून ठार केले. वाघाने हल्ला करून गाईला ठार केल्याची  माहिती गावकऱ्यांनी वनपाल दुर्गे यांना दिली असता त्यांनी दुर्लक्ष केले. वाघाच्या सारख्या घटना होत असताना आधीच दहशत निर्माण झाली आहे आणि त्यातच गावकर्यांनी माहिती देवूनही घटनेचे गाभिर्य लक्षात घेतले नाही आणि गाईला ठार करूनही पंचनामा केला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी क्षेत्र सहाय्यक टोकलवार यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हि दिवसभर गावकरी व गाईचे मालक क्षेत्र सहाय्यक यांची वाट बघत होते मात्र  वनपाल टोकलवार हे सुद्धा गाईच्या पंचनामा करण्याकरिता घटनास्थळी पोहोचलेच नाही. त्यामुळे गावकऱ्यांत संताप, रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे वाघाचे दैनंंदिन रात्री अपरात्रीचे आवागमन वाढले असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वन विभागाच्या अश्या  बेजबाबदारपणाने अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी वेळीच  वठणीवर आणण्याची अंत्यत गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा अश्या घटनेकडे दुर्लक्ष होत राहिलं. वेळीच वनाधिकारी लक्ष देवून न्याय मिळवून द्यावा अशी गावकऱ्यांनी अपेक्षा केली आहे. सतत होणारे वाघाच्या घटनेने दहशत निर्माण झाली असतांंना मागील आठवड्यात गडचिरोली तालुक्यात वाघाने दोन महिलांना ठार केल्याची बातमी ताजी असतांनाच कोरची पासून ५ किमी अंतरावर असलेल्या शेतात वाघाने गाईला ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांंत खळबळ उडाली आहे.

Comments are closed.