Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ट्रक झाला पलटी आणि गावकऱ्यांची झाली सुका मेवा, काजू, बादामाची दिवाळी!

तळेगाव (शा. पंत), १६ नोव्हेंबर: यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त, कर्जबाजारी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दिवाळी आली तशी गेली. पण, नागपूर-अमरावती महामार्गावरील त्या गावांना सुख्या मेव्याचा आनंद लुटता आला. वर्षभयात नसेल घेतले तेवढे काजू आणि बदाम घरी भरला. महामार्गावर देववाडी गावाजवळ काजू, बदाम घेऊन जाणारा ट्रकचा अपघात झाल्याने त्यातील १३ क्विंटल काजू आणि बदामचा रस्त्यावर सडा पडला होता. ही घटना आज १६ रोजी घडली.
दिवाळीचा सण साजरा होत असताना ट्रकमधून वाहून जात असलेल्या सुका मेवा वरच डल्ला मारण्यात आला आणि तोही थोडा थोडका नव्हे तर तब्बल 13 टन काजू आणि बदाम ट्रक पलटी झाल्याने चोरी गेले आहेत.
अमरावती – वर्धा मार्गावर देवावाडी गावाजवळ अचानक पहाटे ५ वाजता ट्रक रस्त्याच्या खाली पलटी झाला . सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. पण, ट्रकमधील काजू आणि बदामाचा 13 टन माल परिसरातील गावातच लंपास करण्यात आला. चोरीचा माल देवावाडी गावात लंपास झाल्याची पक्की खबर पोलिसांकडे होती. त्यामुळे पोलीस दंगल पथक देवावाडी गावात पोहचले. गावात घराघरात तपास करण्यात आला. या देवावाडी गावातून सम्पूर्ण माल हस्तगत करण्यात आला आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरीही गावातील घरात केलेल्या तपासात पोलिसांना काजू आणि बदामचा मोठा साठा सापडला आहे.

Comments are closed.