Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी याही वर्षी केसीसी पोर्टल द्वारे सुविधा उपलब्ध

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्याचे आवाहन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 03 जुलै : गेल्या वर्षी गडचिरोली जिल्हयात शेतकऱ्यांना बँकांमधे वारंवार पीक कर्जासाठी हेलपाटे घालणे टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पोर्टल सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी व त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडून kccgad.com या नावाने पीक कर्ज पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ज्या अर्जदारांनी २०२०-२०२१ खरीप हंगाम मध्ये या पोर्टलद्वारे कर्जाची मागणी केली व अर्ज परिपूर्ण भरून सादर केला आहे अशा अर्जदारांना परत २०२१-२०२२ खरीप हंगामकरिता कर्ज मागणी करायची असेल तर फक्त नूतनीकरण या एका क्लीकचा वापर करून अर्ज भराता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी kccgad.com या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शेतकऱ्यांना बँकाद्वारे होणारे नाहक त्रास कमी करणे, अकारण बँकांनी शेतकऱ्यांचे अर्ज नाकारणे यावर आता जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण असणार आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांनी किती अर्ज केले, बँकांनी किती पात्र किंवा नाकारले यावर सनियंत्रण केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना इंटरनेट किंवा पोर्टल वापरण्याची सुविध नाही त्यांनी जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा गावस्तरावरील आत्माचे शेतकरी मित्र, बँक सखींची मदत घ्यावयाची आहे. kccgad.com या संकेत स्थळावरतीही अर्ज भरण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या पोर्टलचा उद्देश जिल्हयातील पीक कर्ज वाटप वाढविणे असून पीक कर्ज प्रक्रिया यामूळे सुलभ होणार आहे.

शेतकऱ्यांनी असा करावा अर्ज : kccgad.com या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर आवश्यक सूचना वाचा. क्लीक हीअर टु अप्लाय वर जावा. त्यांनतर जर तुम्ही या अगोदर पोर्टल द्वारे कर्ज घेतले असेल तर फक्त आपल्या अर्जाचे नूतनीकरण करावे. जर नवीन कर्ज घेत असाल तर नवीन वर क्लीक करून अर्ज सादर करावा. आवश्यक माहिती भरून अर्ज ऑनलाईन जमा करा. सदर अर्ज परिपुर्ण भरल्यानंतर तो वाचा व जमा करा. त्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून बँकेत आवश्यक कागदपत्रांसह एकदा येवून जमा करा. त्यावेळी अर्ज सादर केल्याची पावती अथवा पोहच घ्या. यानंरतर आपण पुन्हा बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. आपणाला आपल्या पीक कर्जाच्या अर्जाचा तपशील Crop Loan Application Status या मोबाईल ॲपवरही पाहता येईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

..अखेर ‘त्या’ वनमजूरांना मिळाला न्याय; संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाना यश

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.