Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाशिम मधील हजारो नागरिक बनले ऐतिहासिक खगोलीय घटनेचे साक्षीदार…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम, दि. २२ डिसेंबर: 21 डिसेंबरला गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एका दुर्मिळ खगोलीय घटनेचे वाशिम कर साक्षीदार बनले असून हजारो नागरिकांनी ही खगोलीय घटना आपल्या उघड्या डोळ्यांनी तर काहींनी दुर्बिणीच्या साह्याने पाहिली.

काल संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ आले असून हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी ही पाहता आले. गुरु आणि शनी हे ग्रह जवळ येण्याची घटना दर 20 वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आले आहेत ते यापूर्वी 400 वर्षांपूर्वी घडले होते. या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. या पूर्वी असा योग 16 जुलै 1623 रोजी आला होता. तेव्हा ही घटना खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून पहिली होती. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. आज “गुरू” हा सूर्याची एक परिक्रमा 11.87 वर्षांनी पूर्ण करतो. तर शनिला 29.50 वर्षे लागतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळं सुमारे 19 वर्षे आणि 7 महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. मात्र प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात. 21 डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.1 अंश कोनीय (अर्थात 6 कला आणि 6 विकला) अंतरावर होते. हीच अविस्मरणीय घटना वाशिम येथील खगोल अभ्यासक विशाल दवंडे यांनी आपल्या दुर्बीणमधून पाहण्याची संधी वाशीम येथील खगोलप्रेमींना उपलब्ध करून दिली आहे. ही खगोलीय घटना पाहिल्यानं अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.