Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासींच्या कला, संस्कृतीचे जतन झाले पाहिजे – एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत वक्त्यांचा सूर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 25 फेब्रुवारी :- २५ नागरिकरण, आधुनिकीकरण व संस्कृतीकरण्याच्या लाटेत आदिवासी कलेचा ऱ्हास होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे .ज्या वेगाने आदिवासी शहरी संस्कृतीच्या प्रभावाखाली येत आहेत तो वेग किती काळपर्यंत त्यांची कला व संस्कृती टिकवून ठेवील हे सांगणे अवघड आहे. जर आदिवासी कला विनाश पावल्या तर भारतीय पारंपरिक कलांचा आत्माच राहून जाईल आणि हे टाळायचं असेल तर आदिवासी संस्कृती व कलेचा अभ्यास करून ती आदिवासींच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व पर्यावरणीय मूल्यांची कशी निगडित आहे हे दाखवून देण्याचे जबाबदारी आपली असल्याचे कार्यशाळेचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. उमेश बगाडे म्हणाले पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभागाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा ‘आदिवासीच्या ऐतिहासिक स्त्रोतांचे संकलन आणि वापर’ या विषयावर नुकतीच गोंडवाना विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती.

दिल्ली विद्यापीठाचे प्रा. खाखा यांचा  सन्मान करतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि कुलसचिव  डॉ. अनिल हिरेखन

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे ,प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे ,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आणि प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली विद्यापीठाचे प्रा. वर्जिनल खाखा, त्रिवेंद्रम, केरळ ,च्या विकास अभ्यास केंद्राचे डॉ.अभिलाष तडथील इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. रश्मी बंड उपस्थित होते. आदिवासींना जंगलाचे, वनस्पतींच्या वापराबद्दलचे ज्ञान आहे, ते जतन करावयास हवे. त्यांचे सण, उत्सव, वेगवेगळे विधी हे निसर्गाला कोणतीही हानी न करता साजरे केले जातात. यावर त्यांनी प्रकाश टाकला.त्या पासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.असे दिल्ली विद्यापीठाचे प्रा. वर्जिनल खाखा यांनी सांगितले.

आदिवासी साहित्य संकलनाच्या प्रचलित पद्धतीची ,आदिवासींचा मौखिक इतिहास टिकवून ठेवण्याची गरज आहे तसेच आदिवासींच्या प्रचलित पद्धतीवर डॉ. अभिलाष तडथिल यांनी प्रकाश टाकला. अध्यक्ष स्थानावरून बोलतांना कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, आदिवासींकडे आजही अतिशय प्रगत अशा प्रकारचे संगीत आहे. त्यांच्या कला त्यांच्या संस्कृती यांचं जतन झालं पाहिजे मी इतिहास विभागाला आवाहन करतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याचा जतन कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावेत.प्रत्येक वक्ताच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. परिषदेच्या उद्घाटना पूर्वी मान्यवरांच्या हस्ते इतिहास विभागाच्या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्ताविक इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रश्मी बंड यांनी केले संचालन डॉ. नरेश मडावी आणि डॉ. संतोष सुरडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.नंदकिशोर मने, डॉ. प्रफुल्ल नांदे यांनी परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.