Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या योद्धयांचा सन्मान

पुणे क्लायमेट वॉरियर' चे वार्षिक संमेलन उत्साहात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे 25 फेब्रुवारी :- पर्यावरण रक्षणाचा वसा चालविण्यासाठी स्थापन झालेल्या ” पुणे क्लायमेट वॉरियर’ उपक्रमा मधील विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे ,कार्यकर्त्यांचे वार्षिक संमेलन आज उत्साहात पार पडले. इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल(टिळक रस्ता) येथे शनीवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हे संमेलन झाले. असोसिएशन फॉर लर्निंग, एज्युकेशन, रिसर्च अँड ट्रेनिंग (अलर्ट),वनराई, सिंबॉयोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अॅण्ड सस्टेनेबिलिटी या संस्थांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. ‘ अॅलर्ट ‘ च्या संस्थापक खा.अॅड. वंदना चव्हाण ,’वनराई ‘ चे रवींद्र धारिया, .सिंबॉयोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अॅण्ड सस्टेनॅबिलिटी ‘ चे डॉ.ओमप्रकाश , पर्यावरणप्रेमी उद्योजक तसेच इको फॅक्टरी फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंद चोरडिया, कर्नल सुरेश पाटील( निवृत्त ) , माजी महापौर अंकुश काकडे,माजी महापौर प्रशांत जगताप,प्रवीण कुमार आनंद, ग्रीन हिल्स् ‘ संस्थेचे संजय सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण संवर्धन विषयक निबंध, वक्तृत्व, पर्यावरणगीत ,चित्रकला स्पर्धांमधील विजेत्यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. आनंद चोरडिया यांना पहिला ‘ पुणे ग्रीन वॉरियर अॅवार्ड ‘ देऊन गौरविण्यात आले. फॉसिल फ्युएल फ्री इंडस्ट्री, नेट झिरो वेअर हाऊस, नेट झिरो कार्बन, नेट झिरो एनर्जी तयार करण्याचा प्रवास चोरडिया यांनी उलगडला.पर्यावरण विषयक उपक्रम राबविणाऱ्या शाळांना ‘एक कदम आगे ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

खा.अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘ ‘पुणे क्लायमेट वॉरियर ‘ उपक्रमात ६३ शाळा सहभागी झाल्या.पृथ्वीला जागतिक तापमान वाढीचा धोका वाढत आहे. तापमानवाढीच्या दुष्परिणामांवर वैयक्तिक पातळीवर उपाययोजना केल्या पाहिजेत. दक्षिण -उत्तर ध्रुवा नंतर भारत, बांगलादेशाला जागतिक तापमान वाढीचा धक्का बसणार आहे. पुण्यातही पावसाचे पाणी घरात घुसू लागले आहे. आता शांत बसून चालणार नाही.यासंदर्भात जनजागृती घडवून आणण्यासाठी ‘पुणे क्लायमेट वॉरियर ‘ उपक्रमाची रचना केलेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, ‘पर्यावरणविषयक प्रश्नांवर एकत्रित काम केले पाहिजे कारण नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. आपण पर्यावरणाला जपले पाहिजे ‘.अंकुश काकडे म्हणाले, ‘पर्यावरण जागृतीचे प्रयत्न भारतात कमी आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी राहिले पाहिजे.विकासामुळे शहराचा ऱ्हास होत आहे. पुण्याचे रूप बदलत असले तरी पर्यावरण प्रेमींची संख्या वाढली आहे.आव्हानेही वाढली आहेत. तरुणांनी हे आव्हान पेलले पाहिजे. ‘ कर्नल पाटील म्हणाले, ‘ जगाची वाटचाल प्रलयाकडे चालली आहे.किनाऱ्यावरची अनेक शहरे पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन विषयात योगदान देण्याची गरज आहे

या उपक्रमातील स्पर्धांचे सई टेंबेकर, सारंग यादवाडकर, फाल्गुनी गोखले, अनीता गोखले -बेनिंजर यांनी परीक्षण केले.सारंग यादवाडकर, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, रवी चौधरी,मृणालिनी वाणी, नितिन जाधव, संग्राम होनराव,राधिका नाईकवडी,मयूर गायकवाड, आदि उपस्थित होते.अॅड. दिव्या चव्हाण -जाचक यांनी सूत्रसंचालन केले.सिंबॉयोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अॅण्ड सस्टेनॅबिलिटी ‘ चे डॉ.ओमप्रकाश यांनी आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘पुणे क्लायमेट वॉरिअर्स’ उपक्रम – पर्यावरण आणि तापमानवाढ यातील बदलासंदर्भात माहिती देत त्याबाबतच्या उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये याविषयाची जनजागृती करण्यासाठी ‘पुणे क्लायमेट वॉरिअर्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. शहरातील ३० शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीमध्ये शिकणारे सुमारे २० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वातावरण बदलासंदर्भात माहिती देत उपाययोजना करण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासंदर्भात मदत पुरवली जात आहे. तसेच पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवनवीन शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. विविध उपक्रम आणि स्पर्धांद्वारे पर्यावरण, निसर्ग आणि सजीवांची काळजी घेण्याची संस्कृती विकसित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध स्पर्धा आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.