Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना प्रशासनाची आदरांजली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ मार्च: भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे योगदान देणारे शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात या हुतात्म्यांच्या प्रतिमेला अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपाडे, उपजिल्हानिवडणूक अधिकारी कल्पना निळठुबे,  जिल्हा नाझर डी. ए. ठाकरे, नायब तहसिलदार किशोर भांडारकर, सुरेंद्र चव्हाण, चांभारे, चहांदे, दयाराम मेश्राम,  उमाकांत चतुर, जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी वृंदानी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.