Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन भालुसह दोन पिल्ल्यांचा विहिरीत पडून मृत्यु

Get real time updates directly on you device, subscribe now.

ताडोबा बफर झोन मधील वाढोली येथील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २९ एप्रिल: उन्हाळ्याच्या भीषण तापमानात वन्यजीव मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात येत असतो, मात्र कधीकधी ही तहान त्यांच्या जिवावर बेतून जाते. अशीच एक घटना चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबा जंगलातील बफर झोन क्षेत्रात उघडकीस आली आहे. दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्लं चक्क व्हिरित पढल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे,.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महत्वाचा म्हणजे जी विहीर आहे त्याला कठडे नसल्याने विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना उघड झाली आहे. ताडोबाच्या बफर झोनलगत असलेल्या वाढोली येथील शेतात ही विहीर आहे. रात्रीच्या सुमारास अस्वलांचं हे कुटुंब या विहिरीत पडलं असल्याची बाब वर्तवली जात आहे. आज शेतात काही लोक गेले असतांना त्यांना हे दृश्य नजरेस आले. वन्यजीव विभागाला माहिती प्राप्त होताच वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून चार अस्वलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.