Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुंपनात लावलेल्या विद्युतताराने केला घात दोघां शेतकऱ्यांचा विद्युत तारेच्या धक्याने मृत्यु.. गोंडपिपरी व चिमूर तालुक्यातील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

चंद्रपूर, दि. १५ नोव्हेंबर: गोंडपिपरी तालुक्यात येत असलेल्या गोजोली येथील रहिवासी आणि चिमूर तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी असलेल्या युवकाचा स्वतःच लावलेल्या जीवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याने सनासुदीच्या उत्सवात दोनही गावात शोककळा पसरली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साईनाथ मेश्राम आणि प्रमोद जिवातोडे अशी मृत पावलेल्या शेतकऱ्याची नावे आहेत.

गोंडपीपरी तालुक्यातील  गोजोली येथे राहणारा शेतकरी साईनाथ मेश्राम (वय 42) याने आपल्याच शेतात वन्यप्राणी येत असल्याने त्यांनी वन्यप्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी  शेतात विद्युत  प्रवाह लावला  होता व शनिवारी सकाळी ते  शेतात लावलेल्या विद्युत ताराची पाहणी करीत असताना लावलेल्या विद्युत प्रवाह तार त्यांना लक्षात न आल्याने जीवंत ताराला स्पर्श होऊन मृत्यू झाला. या घटनेची  माहिती होताच दिवाळीच्या दिवशी आंनदाच्या वातावरणात  शोककळा पसरली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर दुसऱ्या घटनेत चिमूर तालुक्यातील बेलोरा येथील शेतकरी प्रमोद जीवतोडे आपल्या शेतात काम करत असताना जिवंत विद्युत ताराच्या संपर्कात आल्याने विजेच्या धक्क्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

सध्या शेतकरी आपल्या पिकांची वन्यप्रान्यापासून शेतीचे नुकसान होवू नये यासाठी विविध योजना आखतात. जेणेकरून वन्यप्राण्यापासून  नुकसान  होणार नाही अशी अपेक्षा करतात. जीवंत  विद्युत  तार लावून विसरून जावून स्वतःच फसतात. फसुन चंद्रपूर जिल्हातील दोन वेगवेगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यानी जीव गमवीला आहे.

Comments are closed.