Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुरखेडाच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या आशाताई तुलावी यांची बिनविरोध निवड .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, ९नोव्हे: कोर्ट कचेरी वादात अडकलेल्या येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याने अखेर अध्यक्षपदावर महाविकास आघाडीचा आशाताई तुलावी यांची आज दि ९ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष सभेत अविरोध निवड करण्यात आली आहे.
येथील नगराध्यक्ष पद हे अडीच वर्षाचा कालावधी करीता अनुसूचित जमाती महिला करीता राखीव ठेवण्यात आले होते तेव्हा या पदाकरीता दोन उमेदवारानी नामांकन दाखल केला होता मात्र एका उमेदवाराचा जात प्रमाणपत्रावर हरकत घेण्यात आल्याने हे प्रकरण न्यायलयीन प्रक्रीयेत दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी पासून अटकले होते विद्यमान पदाधिकार्यांचा अवघा २० दिवसाचा कालावधी शिल्लक असताना प्रशासनाकडू दि ९ नोव्हेंबर रोजी निवडणूकीची घोषणा करण्यात आली होती यावेळी सूद्धा महाविकास आघाडीचा आशाताई तुलावी व भाजपा समर्थित शाहेदा मुघल यानी नामांकन दाखल केला होता मात्र मुघल यांचा जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने निरस्त केला असल्याने तिचा नामांकन रद्द करण्यात आला व आशाताई तुलावी यांचा अविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

आज अध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा होताच महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यानी जल्लोष केला याप्रसंगी शिवसेना गटनेते डॉ महेन्द्र कुमार मोहबंसी कांग्रेस चे माजी जि प उपाध्यक्ष जिवन पाटील नाट जि प सदस्य प्रभाकर तूलावी प्रल्हाद कराडे शिवसेना माजी ता प्रमूख आशीष काळे जयेंद्र चंदेल प स उपसभापति श्रीराम दुगा प स सदस्य गिरीधर तितराम, अशोक इंदूरकर,शोएब मस्तान,पुंडलिक निपाने नगरसेविका जयश्री धाबेकर,अनिता बोरकर,चित्रा गजभिए,पुंडलिक देशमुख,सोनू भट्टड, मनोज सिडाम,उसमान पठान व कार्यकर्ते उपस्थीत होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे साहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नमीता बांगर यानी प्रक्रीया पार पाडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.