Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी गावकरी आणि कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड: बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, आरोपींना अटक करावा आणि न्याय मिळावा या मागणीसाठी मस्साजोगचे गावकरी आणि कुटुंबिय आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. 24 तारखेला रात्री बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतल्यानंतर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांना सांगितलं. तसंच दोन दिवसात आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी त्यागलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता 75 दिवस उलटले आहेत, मात्र या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यप फरार आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीआय महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करावं, तसंच हे प्रकरण फार्टट्रॅक न्यायालयात घेऊन यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशा मागण्या या आंदोलकांच्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.